उद्योगात लेसर तंत्रज्ञानाचा वापर वाढणार 

बंगळुरू: लेसर वर्ल्ड ऑफ फोटॉनिक्‍स इंडिया 2018 मेळावा बंगळूर येथे होणार असून यात भारतातील बऱ्याच कंपन्या सहभागी होणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. याबाबत झालेल्या कार्यक्रमात वाहननिर्मिती आणि रेल्वे उद्योगासह विविध क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते. वाहननिर्मिती आणि रेल्वे उद्योगामध्ये लेसर तंत्राचा विविध प्रकारे वापर कसा करता येईल याबाबत मार्गदर्शनाचा या कार्यक्रमात अंतर्भाव करण्यात आला.
मेसे म्युनशेन इंडियातर्फे राबविण्यात आलेल्या अद्ययावत उपक्रमांची माहिती देण्यात आली. इनोव्हेशनमधील प्रवाह आणि ज्ञान हे एकत्रितपणे एकाच छताखाली आणणे हे लेसर वर्ल्ड ऑफ फोटॉनिक्‍स इंडियाचे ध्येय आहे. बजाज ऑटो , बीएचटीसी इंडिया, महिंद्रा आणि महिंद्रा, पटेल इंडस्ट्रीज, फोक्‍सवॅगन इंडिया इ. कंपन्या यात सहभागी झाल्या. उद्योगात या तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे, असे यावेळी सांगीतले गेले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)