तुर्कस्तान आणि सीरियाला सोमवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.8 इतकी नोंदवली गेली आहे. दोन्ही देशातील मिळून आतापर्यंत अडीच हजाराहून जास्त लोकांचा या भूकंपात मृत्यू झालेला आहे. या आधी देखील जगभरात असे महाभयंकर भूकंप जाणवलेले आहेत. ज्यामध्ये हजारो लोकांचे प्राण गेलेले आहेत. जगातील सर्वाधिक विनाशकारी भूकंपाच्या दहा घटनांविषयी…
1) वाल्डिविया, चिली – 22 मे 1960 तीव्रता 9.5 | largest earthquakes ever recorded
1) चिली मध्ये झालेल्या या भूकंपाच्या घटनेमध्ये 1655 जणांचा मृत्यू झाला होता आणि तीन हजाराहून अधिक लोक जखमी झाले होते. या भूकंपानंतर सुमारे दीड लाख लोक विस्थापित झाले. या नैसर्गिक आपत्तीत चिलीचे 550 दशलक्ष अमेरिकी डॉलर एवढे नुकसान झाले होते. भूकंपामुळे आलेल्या सुनामीमुळे जपान फिलिपिन्स ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलँड मध्येही हाहाकार उडाला होता
2) प्रिन्स विल्यम साऊंड, अलास्का, 28 मार्च 1964 तीव्रता 9.2 | largest earthquakes ever recorded
अमेरिकेतील अलास्का येथे 28 मार्च 1964 रोजी 9.2 तीव्रतेचे भूकंपाचे झटके जाणवले. अमेरिकेबरोबरच कॅनडातही या भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र असलेल्या एन्कोरेज शहराला सगळ्यात जास्त नुकसान सहन करावे लागले. तेथील स्थानिकांच्या सांगण्यानुसार भूकंपामुळे किमान तीन मिनिटे या ठिकाणची जमीन हादरत होती.
3) सुमात्रा, इंडोनेशिया 26 डिसेंबर २००४ तीव्रता 9.1
इंडोनेशियातील उत्तरेकडील भागात असेह प्रदेशात जाणवलेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 8.9 इतकी नोंदवली होती. या भूकंपानंतर समुद्रात सुनामीच्या मोठ्या लाटा उठल्या होत्या. या सुनामीचा परिणाम दक्षिण आशिया आणि पूर्व आफ्रिकेतील 14 देशांमध्ये जाणवला होता. या भूकंपात सुमारे दोन लाख 27 हजार 900 लोक मरण पावले किंवा त्यांना मृत जाहीर करण्यात आले. या नैसर्गिक आपत्तीमुळे जवळपास एक कोटी सत्तर लाख लोक विस्थापित झाले. भूकंपाचा केंद्रबिंदू इंडोनेशियामधील बँड आचेह पासून 250 किलोमीटरवर समुद्रात तीस किलोमीटर खोलीवर होता
4) गुजरात, भारत 26 जानेवारी 2001 तीव्रता 7.7
26 जानेवारी 2001 रोजी गुजरात मधील भूज परिसरात अतिशय तीव्र स्वरूपाचा भूकंप जाणवला. सकाळी आठ वाजून 40 मिनिटांनी जाणवलेल्या भूकंपात वीस हजार हून अधिक लोक मरण पावले. या भूकंपामुळे परिसरात जवळपास दोन मिनिटे जमीन हादरत असल्याचे जाणवले होते. भूकंपामुळे अनेकांची घरे जमीनदोस्त झाली. अनेक लोक ढिगार्याखाली अडकून पडले. भुज मधील प्रसिद्ध स्वामीनारायण मंदिराचेही भूकंपामुळे काही प्रमाणात नुकसान झाले होते.
5) हैती, 13 जानेवारी 2010 तीव्रता 7.1
हैतीची राजधानी पोर्ट ऑफ प्रिन्स हे शहर भूकंपामुळे जवळपास नष्ट झाले होते. या भूकंपात तीन लाख 16 हजार लोकांचा मृत्यू झाला. भूकंपामुळे पोर्ट ओ प्रिन्स शहरातील जवळपास 80 हजार इमारती उध्वस्त झाल्या.
6) चिली 27 फेब्रुवारी 2010 तीव्रता 8.8 | largest earthquakes ever recorded
27 फेब्रुवारी 2010 मध्ये चिलीमधील बायोबायो या ठिकाणी जाणवलेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 8.8 इतकी नोंदवली गेली होती. या भूकंपाचे परिणाम चिलीच्या जवळपास 80 टक्के लोकसंख्येवर झाले होते. या भूकंपाचे धक्के केवळ चिलीला जाणवले नाहीत तर आजूबाजूच्या अनेक देशांमध्ये ही भूकंपाचे धक्के जाणवले.
7) पाकिस्तान आठ ऑक्टोबर 2005 तीव्रता 7.6
पाकिस्तानच्या आग्नेयकडील भागात जाणवलेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.6 इतके नोंदवली गेली होती. या भूकंपात सुमारे 73 हजार लोक मरण पावले. या भूकंपामुळे जम्मू-काश्मीरमधील 1244 लोकांना आपले प्राण गमवावे लागले.
8) इंडोनेशिया 11 एप्रिल 2012 तीव्रता 8.6
इंडोनेशियातील सुमात्रा बेटांना जाणवलेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 8.6 इतकी नोंदवली गेली. भूकंपाचे केंद्र जमिनीत खूप खोलवर असल्याने जास्त नुकसान झाले नाही.
9) नेपाळ 25 एप्रिल 2015 तीव्रता 7.8 | largest earthquakes ever recorded
नेपाळमध्ये जाणवलेल्या या भूकंपाच्या धक्क्यामध्ये जवळपास 9000 लोक मरण पावले आणि ऐंशी लाखाहून अधिक लोकांचे जनजीवन पूर्णपणे कोलमडून पडले होते.