रेमडेसिव्हीर औषधांचा भाजप कार्यालयात मोठा साठा – नवाब मलिक

मुंबई  – भारतीय जनता पक्षाच्या सूरत येथील कार्यालयात रेमडेसिव्हीर औषधांचा साठा करण्यात आला असून तेथून भाजपच्या नावावर लोकांना या औषधांचे वितरण केले जात असल्याची बाब राज्यातील मंत्री नवाब मलिक यांनी ट्विटरद्वारे लोकांच्या निदर्शनाला आणून दिली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, देशभर या औषधांचा तुटवडा असताना भाजपच्या सूरत कार्यालयातून मात्र हे औषध लोकांना फुकट वाटले जात आहे, हे राजकारण नाही तर काय आहे असा सवालही त्यांनी केला आहे.

देशात रेमडेसिव्हीर औषधांचा तुटवडा निर्माण झालेला असताना एका राजकीय पक्षाच्या कार्यालयात मात्र याचे साठे असल्याचे दिसून आल्यामुळे आता त्यातूनही मोठा वाद निर्माण होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. या औषधांचा पुरवठा कधी सुरळीत होणार आहे यावर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी अजून कोणतेही भाष्य केलेले नाही.

सध्या हे औषध देशात काळ्या बाजारात विकले जात आहे. रेमडेसिव्हीरचे इंजेक्‍शन 1100 ते 1400 रूपयांना विकले जात असताना त्याची आज काळ्याबाजारातील किंमत मात्र तीन ते चार हजार रूपयांपर्यंत गेली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.