अमरावती – आज रात्री आठ वाजतापासून अमरावती शहरात पुन्हा लाॅकडाऊन लागू होणार असल्याने सर्वच वस्तू खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे दिसत आहे. दारू घेण्यासाठी दारूच्या दुकानासमोरही नागरिकांनी मोठ्या रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.
अमरावती शहर आणि अचलपूर शहरात आज रात्रीपासून सात दिवसांचा कडक लाॅकडाऊन लावण्यात येत आहे. या लाॅकडाऊनच्या काळात अत्यावश्यक आणि जिवनावश्यक वस्तूंना सूट देण्यात आली आहे. मात्र, गैरसोय होऊ नये यासाठी नागरिकांनी जिवनावश्यक वस्तू खरेदीसाठी शहरात मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
दारूच्या दुकाणासमोर रांगा, माॅलमध्ये गर्दी तसेच बस स्थानकातही मोठी गर्दी झाली आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज रात्री आठ वाजतापासून अमरावती आणि अचलपूर शहरात लाॅकडाऊनची घोषणा केलीय. पुढील सात दिवस कडेकोट लाॅकडाऊन पाळला जाणार आहे.
दरम्यान, करोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता यापूर्वीच 36 तासांचा विकेंड लाॅकडाऊन अमरावतीत लावण्यात आला होता. आज रात्रीपासून पुन्हा आठ दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.