पिंपरी -आर्थिक वर्ष 2021-22 संपण्याचा गुरुवारी (दि.31) शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी विकास कामांची बिलांचे पैसे घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लेखा विभागात मोठी गर्दी झाल्याचे गुरूवारी (दि.31) दिवसभर दिसून आले. गर्दी अधिक प्रमाणात वाढल्याने लेखा विभाग कक्षाच्या बाहेर सुरक्षा रक्षक तैनात करावे लागले होते.
शहराच्या विविध भागात आर्थिक वर्षभरात कोट्यावधी रूपयांची विकास कामे होत असतात. मार्च महिना आला की वर्षभरातील थकीत बिलांच्या फायली महापालिकेच्या लेखा विभागाकडे सादर केली जातात. या बिलांची रक्कम चालू आर्थिक वर्षांत घेण्यासाठी महापालिकेच्या लेखा विभागात ठेकेदारांची मोठी गर्दी झाली होती. महापालिकेचे लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे यांच्या स्वाक्षरीने ठेकेदारांना बिलांच्या रक्कमेचे धनादेश अदा करण्यात येतात.
पालिकेतील तळमजल्यावर लेखा विभागाचे कार्यालय आहे. 2021-22 हे आर्थिक वर्ष संपण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी बिलांचे पैसे घेण्यासाठी लेखा विभागात मोठी गर्दी झाल्याचे दिवसभर दिसून आले. जास्तच गर्दी वाढल्याने अखेर लेखा विभाग कक्षाच्या बाहेर सुरक्षा रक्षक तैनात करावे लागले होते.