जनधन खात्यातील रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ

नवी दिल्ली – जनधन योजनेंतर्गत सध्या बॅंकांच्या खात्यात एकूण जमा रक्‍कम एक लाख कोटी रुपयांच्या घरात पोहोचण्याची शक्‍यता आहे. पाच वर्षापूर्वी सर्वसमावेशकतेसाठी या योजनेची घोषणा केली होती.

ताज्या आकडेवारीवरून बॅंक खात्यांमध्ये एकूण रक्कम सातत्याने वाढत असून तीन एप्रिलला ही रक्कम 97,665 कोटी रुपये इतकी होती. त्याचबरोबर योजनेंतर्गत उघडण्यात आलेल्या एकूण खात्यांची संख्याही 35.39 कोटींवर पोहोचली आहे. एकूण खातेदारांपैकी 27.89 कोटी खातेदारांकडे रुपे डेबिट कार्ड उपलब्ध करण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत 28 ऑगस्ट 2018 नंतर खाते उघडणाऱ्य़ा ग्राहकांना दोन लाख रुपयांचा अपघात विमा देण्याचे सरकारने जाहीर केले होते. जनधन खात्यात महिलांचे प्रमाण 50 टक्के असून यातील 59 टक्के महिला खातेदार निमशहरी आणि ग्रामीण भागांतील आहेत. या योजनेकडे केंद्र सरकारचे लक्ष आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.