मुंबई – गोव्यात पार पडलेल्या इंटरनॅशनॅश्नल फिल्म फेस्टिवलमूळे सध्या द काश्मीर फाइल्स हा चित्रपट चांगलाच चर्चेत आला आहे. “हा सिनेमा एका विशिष्ट प्रोपगंडा असलेला आणि वल्गर आहे. इफ्फी सारख्या प्रतिष्ठित महोत्सवात काश्मीर फाईल्स सारख्या सिनेमाला स्थान मिळालं हे अयोग्य आहे”. अशा शब्दात इफ्फीमधील ज्यूरी हेड आणि इस्रायली सिनेमांचे निर्माते नादव लॅपिड यांनी मनोगत व्यक्त करताना काश्मीर फाइल्स सिनेमावर भाष्य केलं होत. यांनतर सिने जगतासह अनेक राजकीय नेत्यांनी यावर मत व्यक्त करायला सुरुवात केली. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील लॅपिड यांच्या मताशी सहमती दर्शवत वक्तव्य केलं होत. आता आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजप नेत्याने त्यांना टोला लगावला आहे.
भाजपच्या अतुल भातखळकर यांनी याला ट्विटनेच उत्तर दिले आहे.अतुल भातखळकर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “काश्मीर फाइल्सवर अश्लीलतेचा आरोप करणारे इफ्फीचे यावर्षीचे मुख्य ज्युरी नदव लॅपिड हे विकृत मानसिकतेचे म्हणून त्यांच्या देशात, इस्त्रायलमध्ये ओळखले जातात. थोडक्यात म्हणजे, ते इस्त्रायलमधले जितेंद्र आव्हाड आहेत,” असा टोला भातखळकरांनी लगावला.
आव्हाड नेमकं काय म्हणाले होते
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत याबाबत भाष्य केलं होत. ट्विटमध्ये ते म्हणतात,”तो इस्रायली असल्याने मुस्लिम विरोधी ‘काश्मीर फाईल्स’ चालवून घेईल अशी सरकारची अपेक्षा होती. पण ‘प्रचारकी आणि गलिच्छ’ चित्रपट म्हणून मुख्य परीक्षक नदाव लापिडने सणसणीत चपराक लगावली”.
तो इस्रायली असल्याने मुस्लिम विरोधी “काश्मीर फाईल्स” चालवून घेईल अशी सरकारची अपेक्षा होती. पण “प्रचारकी आणि गलिच्छ” चित्रपट म्हणून मुख्य परीक्षक नदाव लापिडने सणसणीत चपराक लगावली. pic.twitter.com/LE8djvDcce
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 29, 2022
काय म्हणाले होते नदाव लॅपिड नेमकं
“इफ्फी महोत्सवातील 15 वा सिनेमा होता द काश्मीर फाईल्स होता. पण हा सिनेमा पाहिल्यानंतर आम्हाला धक्का बसला. आम्ही सगळे अस्वस्थ झालो. हा सिनेमा एका विशिष्ट प्रोपगंडा असलेला आणि वल्गर आहे. इफ्फी सारख्या प्रतिष्ठित महोत्सवात काश्मीर फाईल्स सारख्या सिनेमाला स्थान मिळालं हे अयोग्य आहे’.असं मत ज्युरी लॅपिड यांनी व्यक्त केलं होत.