पारनेर – पारनेर, नगर तालुक्यांमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार नीलेश लंके यांचा प्रचाराचा झंझावात सुरू आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असून, त्यांनी अनेक गावांना भेटी दिल्या. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
पारनेर तालुक्यातील पानोली, राळेगणसिद्धी, वाडेगव्हाण, नारायणगव्हाण, मावळेवाडी, यादववाडी, पाडळी रांजणगाव, कळमकरवाडी, खडूस, पळवे बुद्रुक, पळवे खुर्द, जातेगाव, घाणेगाव, गटेवाडी, वडनेर हवेली, मुंगशी, म्हसणे, बाबुर्डी, रुईछत्रपती, वाळवणे, रायतळे, अस्तगाव, रांजणगाव मशिद, पिंपरी गवळी, सुपा, वाघुंडे खुर्द, वाघुंडे बुद्रुक, शहाजापूर, लोणी हवेली आदी गावांना भेटी देऊन लंके यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.
लंके यांच्या प्रचारार्थ दैठणे गुंजाळ येथील श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान येथे नारळ फोडून प्रचारास प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ज्येष्ठ नागरिक व तरुण प्रचारामध्ये सहभागी झाले होते. रिपाइंचे (आर. के.) सचिव संतोष शिंदे यांनी लेखी पत्र देऊन लंके यांना जाहीर पाठींबा दिला. यावेळी किरण शिंदे, विठ्ठल शिंदे, प्रकाश शिंदे, बाळासाहेब गायकवाड, अशोक शिंदे व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
ढवळपुरी गावच्या 19 वाडी-वस्त्यांवर घरोघरी प्रचार करताना राजेंद्र चौधरी, माजी अध्यक्ष बाळासाहेब भनगडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष भाऊ ठोकळ, विजय सासवडे, दत्ता कोरडे, आरपीआयचे युवा नेते राहुल घंगाळे व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सामील झाले होते.