लंकेत दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर छापा; कारवाईवेळी एकूण पंधरा ठार

कोलंबो – श्रीलंकेच्या पुर्व भागातील दहशतवाद्यांच्या एका संशयित अड्ड्यावर सुरक्षा जवानांनी छापा टाकला. त्यावेळी तेथे असलेल्या आत्मघाती पथकातील दहशतवाद्यांनी स्वताला उडवून देत घडवून आणलेल्या स्फोटामुळे किमान पंधरा जण त्यात ठार झाले. ठार झालेल्यांमध्ये सहा मुले, तीन महिलांचा समावेश आहे.

श्रीलंकेत ईस्टर संडेच्या दिवशी झालेल्या बॉंबस्फोटामागे नॅशनल थोवीत जमात या संघटनेचा हात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिस व तपास यंत्रणांनी या संघटनेच्या देशभरातील सर्व हस्तक आणि संशयितांवर छापा सत्र सुरू केले आहे. या अड्ड्यावर छापा घालण्यात आला असताना आत्मघाती स्फोटातील दहशतवाद्यांनी स्वताकडी स्फोटके उडवून दिली त्यात चार दहशतवादीही ठार झाले. यात ठार झालेल्या महिला आणि मुलेही त्यांच्याशीच संबंधीत होते. त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. श्रीलंकेतील या इस्लामिक दहशतवाद्यांची सर्व पाळेमुळे खणून काढे पर्यंत ही कारवाई सुरूच राहील असे तपास यंत्रणांकडून सांगण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.