विक्रम लॅंडरचा ठावठिकाणा नाही- नासा

वॉशिंग्टन- “चंद्रयान -2′ च्या विक्रम लॅंडरचा पुरावा शोधण्यासाठी चंद्राच्या कक्षेत सापडला नाही, अशी माहिती अमेरिकेची अंतराळ संस्था “नासा’ने दिली. 7 सप्टेंबर रोजी भारतीय अवकाश संशोधन संघटनेने “इस्रो’चा लॅंडरशी संवाद खंडीत झाला. त्यापूर्वी, चंद्राच्या अज्ञात भागावर विक्रम लॅंडरने लॅंडिंगचा प्रयत्न केला होता.

“चंद्रयान -2′ च्या विक्रम लॅंडिंगच्या क्षेत्राची ऑर्बिटरला 14 ऑक्‍टोबर रोजी कल्पना दिली होती. परंतु त्या क्षेत्रात लॅंडरच्या अस्तित्वाचा कोणताही पुरावा मिळाला नाही, असे “एलआरओ’ मिशनचे प्रोजेक्‍ट सायंटिस्ट नोह एडवर्ड पेट्रो यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

पेट्रो म्हणाले की कॅमेरा टीमने या प्रतिमांची काळजीपूर्वक तपासणी केली आणि 14 ऑक्‍टोबर रोजी घेतलेल्या प्रतिमांशी लॅंडिंगच्या प्रयत्नापूर्वीच्या प्रतिमांशी तुलना करून बदल शोधण्याचा प्रयत्न केला. चंद्रावर नवीन उल्का शोधण्यासाठी वापरले जाणारे तंत्रही लॅंडरच्या शोधासाठी वापरले गेले. मात्र त्याद्वारेही लॅंडरचा कोणताही ठावठिकाणा शोधता येऊ शकलेला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.