नवी दिल्ली – उद्योगासाठी आवश्यक जमिनीची उपलब्धता माहीत करून देणारी लॅंडबॅंक यंत्रणा उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयातर्फे सुरू करण्यात आली आहे.
सध्या यात फक्त 6 राज्यांचा समावेश आहे. इतर राज्यांशी समन्वय करून ही माहिती संकलित करण्यात येणार असून डिसेंबरपर्यंत भारतभर उपलब्ध असलेली जमीन या योजनेत समाविष्ट केली जाणार असल्याचे उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे. या लॅंडबॅंकेमध्ये 31 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 3,300 इंडस्ट्रियल पार्कचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये 4 लाख 75 हजार हेक्टर जमिनीचा समावेश आहे.
जमिनीबरोबरच संबंधित भूखंडावर वीजपुरवठा, पाणीपुरवठा उपलब्ध आहे का, याची माहिती उद्योगांना मिळणार आहे. या विषयावर सर्व राज्ये आणि केंद्र सरकारने टीम इंडिया म्हणून काम करण्याची गरज असल्याचे मंत्रालयातर्फे सांगण्यात आले.