पुणे – पुरंदर येथे प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी निधीची शाश्वती मिळाल्याशिवाय भूसंपादन सुरु करता येणार नसल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव
यांनी सांगितले.
पुरंदर येथे विमानतळ उभारण्यासाठी सुमारे 2 हजार 832 हेक्टर जागा लागणार आहे. या कामासाठी विमानतळ विकास कंपनीला विशेष अधिकार देण्यात आले आहेत. 2 हजार 832 हेक्टर पैकी 2 हजार हेक्टरवर प्रत्यक्षात विमानतळ उभारण्यात येणार आहे. जागेच्या भूसंपादनासाठी तीन ते चार हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
विमानतळाचा मास्टर प्लॉन तयार करण्याचे काम यापूवीच कंपनीकडून डार्स या कंपनीला देण्यात आले आहे. तर उर्वरीत 832 हेक्टर जागेवर विमानतळासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी विकास आराखडा कंपनीकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून यापूर्वीच सात गावांमधील हद्दीचे नकाशे जाहीर करण्यात आले आहे. त्यावर नागरिकांकडून सूचना हरकती मागविण्यात आल्या आहेत. मात्र, त्यावर सुमावणी झालेली नाही.
पुरंदर विमानतळासाठीच्या जागेपासून ते सर्व प्रकाराच्या मान्यता यापूर्वीच केंद्र आणि राज्य सरकारकडून देण्यात आला आहेत. भूसंपादनासाठी निधीची शाश्वती मिळणे बाकी आहे. विमानतळासंदर्भात स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद चालू असल्याचे राव यांनी सांगितले.
गावनिहाय भूसंपादन होणारे क्षेत्र
-वनपुरी – 339 हेक्टर
-उदाची वाडी – 261 हेक्टर
-कुंभारवळण- 351 हेक्टर
-एखतपूर -217 हेक्टर
-मुंजवडी-143 हेक्टर
-खानवडी- 484 हेक्टर
-पारगाव-1037 हेक्टर