CoronaUpdates : हवेतून पसरतोय करोना ? ‘लेन्सेट’च्या संशोधनात खळबळजनक दावा

नवी दिल्ली – जागतिक पातळीवर करोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. अनेक देशांमध्ये करोनाची दुसरी, तिसरी आणि चौथी लाट आली आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढत आहे. त्यातच लेन्सेटच्या संशोधनातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये कोविड-१९ महामारी ठरलेला SARS-CoV-2 व्हायरस मुख्यत: हवेतून परसत असल्याचं म्हटलं आहे.

ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडा येथील तज्ज्ञांच्या अभ्यासात म्हटलं की, करोना संसर्गावर उपचार करण्यासंदर्भातील प्रयत्न अपयशी ठरण्याचं मुख्य कारण, व्हायरस हवेतून पसरतोय हेच आहे. अमेरिकेतील कोलराडो बाऊनल्डेर विद्यापीठाचे जोस लुई जिमेनजे यांनी म्हटलं की, करोना व्हायरस हवेतून पसरण्याचे पुरावे मिळाले आहेत. जागतिक आरोग्य संघटना आणि इतर आरोग्य संस्थांनी व्हायरसच्या हवेतून होणाऱ्या प्रसाराविषय़ीच्या दाव्यांचा स्वीकार करावा. तसेच व्हायरसचा हवेतून होणारा प्रसार कमी करण्यासाठी प्रयत्न करावे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

ब्रिटनमध्ये ऑक्सफोर्ड विद्यापीठातील संशोधकांच्या नेतृत्वात एका टीमने करोना व्हायरस हवेतून पसरत असल्याचं सांगत १० कारणं दिली आहेत. यामध्ये गेल्या वर्षी अमेरिकेतील सुपर-स्प्रेडर घटनांची उदाहरण दिली आहेत. तसेच SARS-CoV-2 व्हायरसचा ट्रान्समिशन रेट मोकळ्या हवेत कमी असून इंडोअर व्हेंटीलेशनमध्ये अधिक असल्याचं म्हटलं आहे.

तज्ज्ञांनुसार, SARS-CoV-2 व्हायरस हवेत आढळून आला आहे. तसेच प्रयोगशाळेत SARS-CoV-2 वायरस  सुमारे 3 तासांपर्यंत हवेत संक्रमण अवस्थेत राहिला आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.