लालूप्रसाद यांचा बंगला, बॅंक खाती जप्त होणार

पाटणा – राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव हे बेनामी मालमत्ता प्रकरणात पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत. प्राप्तिकर खात्याकडून त्यांचा 3 कोटी 70 लाखांचा बंगला तसेच 41 बॅंक खात्यांवर जप्ती येणार आहे.

जप्तीची कारवाई करण्यासाठी प्रथम अपिलीय प्राधिकरणाने प्राप्तिकर खात्याला परवानगी दिली आहे. जयप्रकाश नारायण विमानतळाजवळील दुमजली आलिशान बंगला फेअर ग्रो होल्डिंग या कंपनीच्या नावावर आहे. लालूप्रसाद यांचे मुलगे तेजस्वी आणि तेजप्रताप, तर मुली रागिणी आणि चंदा हे या कंपनीचे संचालक आहेत. कंपनीचे मुख्यालय दिल्लीत असून लवकरच या कंपनीवर स्थायी स्वरूपात जप्ती आणली जाणार आहे. जप्तीच्या कारवाईने लालूप्रसाद यांचा पाय आणखीन खोलात जाणार असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.