Lalu Prasad Yadav On Mahakumb। राजद प्रमुख आणि माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांनी महाकुंभमेळ्याबाबत मोठे विधान केले आहे. त्यांनी,”कुंभ फालतु आहे, त्याला काही अर्थ नाही. असे म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला आहे तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर दिल्लीतील लेडी हार्डिंग आणि एलएनजेपी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी रात्री प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १६ वर हा अपघात झाला. मृतांमध्ये बहुतेक महिला आणि मुलांचा समावेश आहे. रेल्वेमंत्र्यांनी चेंगराचेंगरीच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या चेंगराचेंगरीवर प्रतिक्रिया देताना लालू प्रसाद यादव यांनी महाकुंभाविषयी वादग्रस्त विधान केले आहे.
#WATCH | Stampede at New Delhi Railway Station | Patna, Bihar: Former Union Railway Minister and RJD Chief Lalu Prasad Yadav says, “The incident is very unfortunate and I offer my condolences to the victims. This is a mismanagement by the Railway that led to the loss of so many… pic.twitter.com/83icLBvtSm
— ANI (@ANI) February 16, 2025
महाकुंभ आणि चेंगराचेंगरीविषयी बोलताना लालूप्रसाद यादव यांनी,” ” कुंभ फालतु आहे, त्याला काही अर्थ नाही. रेल्वे स्थानकावर घडलेली घटना दुःखद आहे. आम्ही मृतांना श्रद्धांजली अर्पण करतो. ही रेल्वेची चूक आहे. रेल्वेच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला आहे. हे रेल्वेचे अपयश आहे. रेल्वेमंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी.” अशी मागणी केली आहे.
मृतांमध्ये बहुतेक लोक बिहार आणि दिल्लीचे Lalu Prasad Yadav On Mahakumb।
या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतेक लोक बिहार आणि दिल्लीतील रहिवासी आहेत. बिहारमधील ९, दिल्लीतील ८ आणि हरियाणामधील १ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील परिस्थिती नियंत्रणात आहे. अपघाताचे कारण तपासले जात आहे.
चेंगराचेंगरीवर रेल्वेप्रशासनाचे उत्तर Lalu Prasad Yadav On Mahakumb।
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीबाबत रेल्वेचे पहिले अधिकृत निवेदन समोर आले आहे. उत्तर रेल्वेचे सीपीआरओ हिमांशू शेखर उपाध्याय म्हणाले की, काल ही दुःखद घटना घडली तेव्हा पाटण्याकडे जाणारी मगध एक्सप्रेस नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर उभी होती आणि जम्मूकडे जाणारी उत्तर संपर्क क्रांती प्लॅटफॉर्म क्रमांक १५ वर उभी होती.
दरम्यान, फूट ओव्हर ब्रिजवरून प्लॅटफॉर्म क्रमांक १४-१५ वर जाणाऱ्या पायऱ्यांवरून एक प्रवासी घसरला आणि त्याच्या मागे उभे असलेले अनेक प्रवासी त्याचा फटका बसले आणि ही दुर्दैवी घटना घडली. एक उच्चस्तरीय समिती याची चौकशी करत आहे. कोणतीही ट्रेन रद्द करण्यात आली नाही किंवा कोणत्याही ट्रेनचे प्लॅटफॉर्म बदलण्यात आले नाही. आता प्लॅटफॉर्मवरील परिस्थिती सामान्य आहे. सर्व गाड्या त्यांच्या नेहमीच्या वेळेनुसार धावत आहेत.