पाटणा – बिहारमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार पाडण्याच्या हालचाली माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लालू सध्या चारा घोटाळा प्रकरणात तुरूंगात असून तेथूनच त्यांच्या हालचाली बिनदिक्कत सुरू असल्यामुळे हा प्रकार धक्कादायक मानला जातो आहे.
भारतीय जनता पार्टीचे आमदार लालन पासवान यांना लालूंनी फोन केला होता. त्यावेळी या दोघांमध्ये झालेल्या संभाषणाची ऑडियो व्हायरल झाली आहे. त्यात लालूंनी अगोदर पासवान यांना विजयी झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्याच्या ऐकू येते आहे. त्यानंतर बिहार विधानसभा अध्यक्ष पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत पासवान यांना पक्षाच्या उमेदवाराला मतदान न करण्याचा सल्ला देताना दिसतेय.
आपण भाजपमध्ये असल्याचे पासवान यांनी सांगितल्यावर घरीच राहा, मतदानाला जाउ नका, असे लालूंनी त्यांना सूचवले. करोना झाला आहे, असेही सांगण्यास सांगितले. आमच्यासोबत आलात तर आम्ही तुम्हाला आणखी पुढे घेउन जाउ व मंत्रीही करू असे आमिषही लालूंनी त्यांना दाखवले.
लालू यादव ने दिखाई अपनी असलियत
लालू प्रसाद यादव द्वारा NDA के विधायक को बिहार विधान सभा अध्यक्ष के लिए होने वाले चुनाव में महागठबंधन के पक्ष में मतदान करने हेतु प्रलोभन देते हुए। pic.twitter.com/LS9968q7pl
— Sushil Kumar Modi (@SushilModi) November 25, 2020
दरम्यान, भाजपचे नेते व माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी या प्रकरणावरून लालूंवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीटरवर एक फोन नंबरही दिला असून त्यावरून लालू भाजपच्या आमदारांना फोन करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संबंधित नंबरवर आपण फोन केला तेव्हा पलिकडून लालूंचाच आवाज आला असा दावा करताना लालूंनी अशा घाणेरड्या गोष्टी थांबवाव्यात असा इशाराही मोदी यांनी दिला आहे.
सुशील मोदी यांनाच त्यांच्या पक्षात काही किंमत नाही. त्यामुळे लालूंवर आरोप करत आपली बुडणारी नाव पार करण्याचा ते प्रयत्न करत असल्याचा दावा राष्ट्रीय जनता दलाने केला आहे.
लालू प्रसाद की साज़िश को NDA ने नाकाम कर दिया ।बिहार विधान सभा के अध्यक्ष पद के चुनाव में श्री विजय कुमार सिन्हा के निर्वाचित होने पर बधाई ।@ZeeBiharNews @News18Bihar @ANI
— Sushil Kumar Modi (@SushilModi) November 25, 2020