नवी दिल्ली : भारतीय महिला हाॅकी संघाची खेळाडू ‘लालरेम्सियामी’ ही आंतरराष्ट्रीय हाॅकी फेडरेशनच्या (FIH) २०१९ च्या रायझिंग स्टार पुरस्काराची मानकरी ठरली आहे. १९ वर्षीय ‘लालरेम्सियामी’ हिने अर्जेंटिनाच्या जूलिएटा जांकुनासला (व्दितीय) तर नेदरलॅन्डसच्या फ्रेडरिक माटला हिला (तृतीय) मागे टाकत हा पुरस्कार पटकावला. आंतरराष्ट्रीय हाॅकी महासंघाने शनिवारी याची घोषणा केली.
Here is our winner for the 2019 FIH Rising Star of the Year (Women) #HockeyStarsAwards pic.twitter.com/NMUSjPMwdV
— International Hockey Federation (@FIH_Hockey) February 10, 2020
मिझोरमच्या लालरेम्सियामी हिला सर्व राष्ट्रीय संघटनेकडून ४० टक्के मते मिळाली, तर मीडियाकडून २८.४ टक्के मते आणि चाहते/खेळाडूंकडून ३६.४ टक्के मते मिळाली.
Moments of a surprise for Lalremsiami when we presented her FIH Rising Star of the Year 2019 Award. @TheHockeyIndia @FIH_Hockey @KirenRijiju @IndiaSports @Media_SAI pic.twitter.com/NwfebosUCd
— Rani Rampal (@imranirampal) February 11, 2020
साल २०१७ साली बेलारूस विरू ध्दच्या सामन्यातून लालरेम्सियामी हिने भारतीय संघात पदार्पण केले. तिने २०१७ मध्ये कोरिया आणि २०१९ मध्ये स्पेनविरूध्द सर्वाधिक गोल केले होते.