शिरूर (प्रतिनिधी) – करोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन यामुळे पावणेतीन महिने बंद असलेली एसटी बस सेवा सोमवार (दि. 15) पासून सुरू झाली; परंतु प्रवाशांनी तुरळक असा प्रतिसाद दिला असून ही संख्या वाढेल अशी शक्यता शिरूर एसटी बस स्थानकाचे आगार प्रमुख महेंद्र माघाडे यांनी सांगितले.
आगारातील एसटी बससेने जिल्हा अंतर्गत काही भागात एकूण 28 फेऱ्यांना 15 ते 20 टक्केच प्रतिसाद मिळाला. बसेसला काही भागात अतिशय कमी तर काही भागात प्रतिसाद मिळत मिळाला. शिरूर बसस्थानकात प्रवाशांची वाट पहावी लागली;परंतु शिरूर-वाघोली या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला.
करोनाची भीती आणि दहशत आजही नागरिकांमध्ये आहे, त्यामुळे नागरिक घराच्या बाहेर किंवा प्रवास करण्यास पडत नसल्याचे दिसून आले. आगारात सोशल डिस्टन्स, मास्क वापरणे, एसटी निर्जंतुक करणे याकडे प्राधान्याने लक्ष दिले जात आहे. यापुढील काळात बस सेवा सुरू राहणार असून तालुका व पुणे जिल्ह्यातील अनेक भागात एसटी बस रोज धावणार आहेत.