रीम बेजेंमा याने अतिरिक्त वेळेत केलेल्या गोलच्या जोरावर रियल माद्रिदच्या संघास ‘ला लीगा’ स्पर्धेत पराभव टाळण्यात यश आले, मात्र त्यांना गुणतालिकेत अव्वल स्थान काही मिळवता आलं नाही. जिनेदिन जिदानचा संघाने वेलेंसियाविरूध्दचा सामना १-१ ने बरोबरीत सोडवला. यामुळे रियल माद्रिद संघाचे अन् बार्सिलोनाचे समान ३५ गुण झाले आहेत, पण गोलफरकाच्या आधारे बर्सिलोना पहिल्या तर रियल माद्रिद दुस-या स्थानी आहे.
Epic late drama at Mestalla as it ends all square between @valenciacf_en and @realmadriden! ✨🤝
💥 @Carlos10Soler
💥 @Benzema#ValenciaRealMadrid 1-1 pic.twitter.com/sM264cdODq— LALIGA English (@LaLigaEN) December 15, 2019
सामन्याच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघानी एकमेकांविरूध्द संघर्षमय खेळ केला, पण दोन्ही संघ गोल करण्यात अपयशी ठरले. दुस-या सत्रात दोन्ही संघानी आक्रमक खेळ सुरू केला, पण याचा फायदा वेलेंसियाला ७८ व्या मिनिटाला झाला, कार्लोस सोलेर याने शानदार गोल करत संघास १-० ने आघाडी मिळवून दिली.
प्रत्युत्तरात रियल माद्रिदने बरोबरी साधण्यासाठी पूर्ण ताकद पनाला लावली आणि सामन्याच्या निर्धारित वेळेनंतर मिळालेल्या अतिरिक्त वेळेमध्ये बेजेंमाने (९०+५) गोल करत सामन्यात १-१ ने बरोबरी साधली.