पुणे : स्पॅनिश लीग ‘ला लीगा’ फुटबाॅल स्पर्धेतील सामन्यात रियल माद्रिद संघाने वलादोलिड संघावर १-० ने विजय मिळविला. या विजयासह जिनेदिन जिदानचा संघ आॅक्टोबरनंतर पहिल्यांदाच गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहचला आहे.
An important win for @realmadriden which puts them on top of the #LaLigaSantander table! 💜🔝#RealValladolidRealMadrid 0-1 pic.twitter.com/iSyWJNqGY0
— LALIGA English (@LaLigaEN) January 26, 2020
रियल माद्रिद संघाकडून नाचो याने ७८ व्या मिनिटाला गोल केला. हा गोल निर्णायक ठरला. त्याचा हा ‘ला लीगा’ मधील सातवा गोल आहे.
📄 @realmadriden occupy the top position in #LaLigaSantander while @SevillaFC_ENG secure the 3rd position! 💜❤️ pic.twitter.com/py2Xp5CcgR
— LALIGA English (@LaLigaEN) January 26, 2020
रियल माद्रिद संघाचा २१ सामन्यातील हा १३ वा विजय असून ४६ गुणांसह ते गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहचले आहेत. बार्सिलोनाचा संघ याआधी अव्वलस्थानी होता, मात्र शनिवारी वेलेंसिया संघाने बार्सिलोनाचा २-० ने पराभव केला. त्यानंतर त्यांची ४३ गुणांसह दुस-या स्थानी घसरण झाली.