lalbaugcha raja visarjan । “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” … बाप्पा चालले गावाला चैन पडेना जीवाला…” असा जयजयकार करत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे. आज अनंत चतुर्थदशी असून बाप्पाच्या विसर्जनाचा आजचा दिवस आहे. त्यासाठी आता राज्यातील सर्व गणपती मंडळ सज्ज झाले आहेत.
लालबाग परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे. कार्यकर्त्यांची देखील मंडप परिसरात मोठी गर्दी वाढली आहे.लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली आहे.
सकाळी ९.३० दरम्यान लालबागच्या राजाची विधीवत पूजा पार पडत आरती होणार आहे.आरती झाल्यायानंतर सकाळी ११ च्या दरम्यान, लालबागचा राजा मंडपातून बाहेर पडताना दिसेल.
भाविकांनी 10 दिवस गणरायाची सेवा केल्यानंतर आता बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे.मुंबईतील विसर्जन मिरवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणा देखील सज्ज आहे.