fbpx

लाल बावटा फडकावत ‘आयटक’ ची शतकपूर्ती

पिंपरीऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेस (आयटक) या केंद्रीय कामगार संघटनेने शनिवारी (दि. 31) वाटचालीची शतकपूर्ती पूर्ण केली. यानिमित्त ग्रीव्हज कॉटन ऍण्ड अलाईड कंपनीज एम्प्लॉईज युनियनच्या आकुर्डीतील श्रमशक्ती भवन येथे कामगारांनी मोठ्या उत्साहात लाल बावटा फडकविला. कामगार एकजुटीचा विजय असो! लाला बावटेकी जय! लाल झेंडे की जय! या घोषणा देत आसमंत दणानून सोडला. त्यानंतर दिवंगत कामगार नेत्यांना अभिवादन करून संघटनेची शंभरी मोठ्या उत्साहात साजरी केली.

कॉ. एस. डी. गोडसे, कॉ. व्ही. व्ही. कदम, कॉ. एल. एस. मारू, कॉ. एस. जी. सुळके, कॉ. आर. एम. लोंढे, कॉ. एन. आर. आकोटकर, कॉ. ए. एम. रोहम, कॉ. ए. एम. गायकवाड, कॉ. एम. आर. कुंभार, कॉ. एस. व्ही. गोडसे, कॉ. के. के. पेढणेकर, कॉ. माळी, कॉ. शिवराज शिंदे, कॉ. उमेश धर्मगुत्ते, भाकपच्या महिला फेडरेशनच्या पुणे जिल्हा सचिव कॉ. लता भिसे, कॉ. अरविंद जक्का, ग्रीव्हज कॉटन ऍण्ड अलाईड कंपनीज एम्प्लॉईज युनियन, पूना एम्प्लॉईज युनियन प्रीमियम ट्रान्स्मिशन, इंदुसूर गिअर, रेकोल्ड थर्मो, वोल्मोंट स्ट्रक्‍चर या कंपन्यांमधील कामगार या वेळी उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.