नवी दिल्ली – जर्मन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनला अखेर रजतपदकावर समाधान मानावे लागले. रविवारी झालेल्या अंतिम लढतीत त्याला थायलंडच्या उन्लावुत वितीसार्नकडून 21-18, 21-15 असा पराभव पत्करावा लागला.
वितीसार्नने या स्पर्धेचे हे पहिलेच विजेतेपद ठरले. या दोन खेळाडूंमध्ये आजवर झालेल्या सात लढतींत आता वितीसार्न 4-3 असा आघाडीवर आहे. अंतिम फेरी थाटात गाठलेल्या लक्ष्यला या सामन्यात काही चुकांचा फटका बसला.