मुंबई – अभिनेता शाहरुख खाननंतर आता त्याची दोन्ही मुलं त्याच्या पावलावर पाऊल ठेवण्यास तयार आहेत. किंग खानची पुढील पिढी लवकरच सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. यामध्ये त्याची मुलगी सुहाना आणि मुलगा आर्यन खानचा समावेश आहे. मुलगी सुहाना खान ‘द आर्चिज’मधून इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. तर आर्यन खान एका वेब सिरीजद्वारे दिग्दर्शक म्हणून समोर येणार असल्याचे समजते. आर्यन खानने आपल्या सिरीजची तयारी पूर्ण केली असून प्रमुख भूमिकेतील अभेट देखील फायनल झाल्याचे समजते.
आर्यन लवकरच त्याची बहुप्रतीक्षित ‘स्टारडम’ वेब सीरिज घेऊन येत आहे. ज्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. अशात आता या सिरीजबाबत एक मोठी अपडेट समोर आले आहे.आर्यन खानने त्याच्या सीरिजसाठी 50 नव्हे, 100 नव्हे तर तब्बल 800 ऑडिशन्स घेतल्या. या 800 ऑडिशन्समधून अखेर शाहरुख खानच्या मुलाला त्याचा हिरो मिळाला.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, ‘स्टारडम’मध्ये सुप्रसिद्ध अभिनेता लक्ष्य लालवानीला घेण्यात आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ‘स्टारडम’चे शूटिंग या महिन्यातच सुरू होणार होते, परंतु ते काही आठवड्यांसाठी पुढे ढकलले गेले आहे. लवकरच या मालिकेसाठी आणखी तीन कलाकारांची नावे समोर येणार आहेत. ही सिरीज शाहरुख खान आणि गौरी खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार केला जाणार आहे.
कोण आहे लक्ष्य ललवानी?
लक्ष्यने टेलिव्हिजनमधून आपल्या करिअरची सुरुवात केली, ज्यामध्ये ‘वॉरियर हाई’, ‘प्यार तूने क्या किया’, ‘परदेस में है मेरा दिल’, ‘अधुरी कहानी हमारी’ आणि ‘पोरस’ सारख्या शोचा समावेश आहे. याशिवाय दोन वर्षांपूर्वी करण जोहरने त्याच्या ‘दोस्ताना 2’ या चित्रपटासाठी लक्ष्यलाही कास्ट केले होते, मात्र हा चित्रपट गेल्या दोन वर्षांपासून रखडला होता.