‘विष्णुजी शेकोजी ‘हायस्कूल’च्या’ माजी विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
वाघोली : वाघोली येथे भैरवनाथ तळ्यात नुकत्याच झालेल्या दुर्घटनेत काहींना आपला जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेतील व्यक्तींचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला देखील आपला जीव गमवावा लागल्याची घटना नुकतीच घडली होती. दत्तात्रय रघुनाथ जाधव असे या तरुणाचे नाव आहे . घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लक्षात घेऊन विष्णुजी शिकोजी सातव हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांनी दत्तात्रय जाधव यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करून सामाजिक आदर्श उभा केला आहे.
याबाबत हवेली तालुका ‘भाजप’चे उपाध्यक्ष तथा हायस्कूलचे माजी विद्यार्थी प्रदीप सातव पाटील यांनी सांगितले की, घरातील जाधव हा एकमेव कमवणारा तरुण होता. त्याच्या अपघातामुळे कुटुंबाची वाताहात होऊ नये म्हणून कुटुंबाला विद्यालयातील सन १९९६ माजी विद्यार्थ्यांनी मदत केली आहे.
दुसऱ्याचा जीव वाचवताना स्वतःचा जीव गमवावा लागला अशा कुटुंबाला समाजाकडून योग्य ती मदत व्हावी या भावनेने सर्व माजी विद्यार्थ्यांनी आर्थिक स्वरूपाची मदत जाधव कुटुंबीयांना केली आहे. यापुढील काळात देखील समाजातील विविध संघटना संस्था आदींच्या माध्यमातून ही मदत चालू ठेवणार असल्याचे प्रदीप सातव यांनी सांगितले.
यावेळी बाळासाहेब हरगुडे, विजय जाचक, बाबा बांडे, रिता ठाकूर, सचिन शेटिया, राहुल सातव, श्यामकांत सातव, देविदास आव्हाळे,संतोष येवले, निलेश खेडेकर, संतोष आव्हाळे, रवींद्र सातव, सचिन बोत्रे, सचिन शिंदे, गणेश वाघोलीकर, अजित गवळी, दत्तात्रय रकटाते, नितीन खांदवे, भारती कुंभार, संजय पाटील, जीवन पोखरणा, स्वाती ठाकूर, प्रवीण रणसिंग, केतन तांबे, हर्षदा मर्ढेकर, भूषण बोराडे, विनोद काळे, सुनील करकांडे,नितीन डोके, अशितोष झरेकर, विक्रम दौंडकर, सचिन सातव, सारिका हरगुडे आदींनी पुढाकार घेऊन मदत केली आहे.