Lakhimpur Kheri violence Case । लखीमपूर खेरी या ठिकाणच्या हिंसाचार प्रकरणी तुरुंगात असलेले माजी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मिश्रा यांना आज न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय. मात्र, लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील सुनावणी जलद करून वेळ निश्चित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाला दिले आहेत.
ऑक्टोबर 2021 मध्ये लखीमपूर खेरीच्या टिकुनिया येथे हिंसाचार झाला. जेव्हा शेतकरी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या भेटीला विरोध करत होते. या हिंसाचारात 8 जणांचा मृत्यू झाला होता. यूपी पोलिसांच्या एफआयआरनुसार, आशिष मिश्रा बसलेल्या एसयूव्हीने चार शेतकऱ्यांना चिरडले. यापूर्वी गेल्या वर्षी 25 जानेवारीला सुप्रीम कोर्टाने आशिष मिश्रा यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता.
आशिषला २०२१ मध्ये झाली होती अटक Lakhimpur Kheri violence Case ।
तीन कृषी सुधारणा कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या निदर्शनांदरम्यान हिंसाचार उसळल्यानंतर सहा दिवसांनी 9 ऑक्टोबर रोजी आशिषला अटक करण्यात आली. यूपी पोलिसांच्या एफआयआरनुसार, आशिष मिश्रा बसलेल्या एसयूव्हीने चार शेतकऱ्यांना चिरडले. यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी एसयूव्ही चालवणाऱ्या व्यक्तीला आणि भाजपच्या दोन कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या हिंसाचारात एका पत्रकाराचाही मृत्यू झाल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.
न्यायालयाने या अटींसह जामीन मंजूर केला Lakhimpur Kheri violence Case ।
गेल्या वर्षी जानेवारीमध्ये सुप्रीम कोर्टाने मिश्रा यांना अंतरिम जामीन मंजूर करताना अनेक अटी घातल्या होत्या. आशिष मिश्राला सुटकेच्या एका आठवड्यात उत्तर प्रदेश (यूपी) सोडावे लागेल, असा निकाल न्यायालयाने दिला होता. तो यूपी किंवा दिल्ली/एनसीआरमध्ये राहू शकत नाही. त्याला त्याच्या ठिकाणाबद्दल न्यायालयाला माहिती द्यावी लागेल आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी किंवा मिश्रा यांनी साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास त्याचा जामीन रद्द होईल. मिश्राला त्यांचा पासपोर्ट सरेंडर करावा लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. खटल्याच्या कामकाजाला हजर राहिल्याशिवाय ते उत्तर प्रदेशात दाखल होणार नाहीत.