लाडूप्रेमी श्रद्धा

छिछोरे आणि साहो या चित्रपटांच्या शुटिंगमध्ये व्यग्र असणाऱ्या श्रद्धा कपूरची सध्या धावपळ सुरू आहे. या चित्रपटाच्या शुटिंगसाठी तिला मुंबई आणि हैदराबाद येथे पळापळ करावी लागत आहे. काही दिवसांपूर्वी तिचे कुटुंबीय संक्रातीचा सण साजरा करण्यासाठी मुंबईत परतले होते. श्रद्धाला घरात तयार केलेले गोड पदार्थ खूप आवडतात, असे सांगितले जाते. ती नेहमी मुंबईत शुटिंगदरम्यान घरात बनवलेली मिठाई सोबत घेऊ जाते. ही मिठाई ती सहकाऱ्यांना वाटते.

विशेष म्हणजे तिच्या घरात तयार केलेले तिळाचे लाडू खूपच छान होतात. म्हणूनच श्रद्धाने “साहो’ चित्रपटातील नायक प्रभाससह आपल्या टिमसाठी डबा भरून तिळाचे लाडू आणि शुद्ध तुपापासून तयार केलेली खिचडी पाठवली. श्रद्धाच्या चित्रपटाचा विचार केल्यास स्त्री या चित्रपटाच्या यशानंतर आगामी चित्रपट साहो, छिछोरे, सायना आणि एबीसीडी.3 मध्ये दिसणार आहे. या सर्व चित्रपटात ती वेगवेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
2 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)