Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होतात. मात्र या योजनेप्रकरणी अनेकांनी चुकीच्या पद्धतीने पैसे घेतल्याचे समोर आल्यानंतर काही नियम लावण्यात आले. यातील केवासीचा मुद्दा महत्त्वाचा ठरला. मात्र अनेक महिलांनी केवासी करूनही त्यांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही. त्याप्रकरणी अनेक महिलांनी संताप व्यक्त केला. यानंतर आता लाडकी बहीण योजनेचे महिन्याला मिळणारे १५०० रुपये २१०० रुपये करण्याचीही मागणी सातत्याने केली जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये देणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. परंतु, याची अंमलबजावणी कधी होणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत मोठी अपडेट दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी 1500 रुपयांचे 2100 रुपये योग्य वेळी करणार आहे. आम्ही लाडक्या बहिणींना दिलेला शब्द पाळणार आहोत. मी बोलतो ते करून दाखवतो, असा ठामपणे विश्वास व्यक्त केला. Health Tips: उठताच चक्कर येणे म्हणजे काय? जाणून घ्या कारणे आणि उपाय नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे? लाडकी बहीण योजनेसाठी ४५ हजार कोटी एका वर्षाचा खर्च होता, भल्याभल्यांची हिंमत झाली नाही. मात्र, जे खोडा घालायचे त्यांना २३२ नंबरचा घोडा दाखवला. महारष्ट्राच्या इतिहासात २३२ जागा महायुतीच्या कधी निवडून आल्या नव्हत्या. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना भरभरुन मतदान केले. माझ्या आईची काटकसर आणि माझ्या पत्नीच्या डोळ्यातील अश्रू पहिले होते, म्हणून मी याचा विचार करुन महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. १५०० रुपये लाडक्या बहिणींना देतो त्याच्या अनेक सक्सेस स्टोरी आहेत. आता १५०० रुपयांचे २१०० रुपये योग्यवेळी करणार, हा शब्द लाडक्या बहिणींना दिलेला आम्ही पाळणार आहोत, मी बोलतो ते करून दाखवतो, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये कधीपासून मिळणार? पुढे शिंदे म्हणाले, “माझी कर्मभूमी मुंबई असली तर माझी जन्मभूमी सातारा आहे. सातारा जिल्ह्याची गौरवशाली परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण कारभार करतो. संपत्ती कमावली यापेक्षा माणसे किती कमवली हे मी पाहिले. Mumbai Municipal Commissioner : मुंंबई पालिकेला महापौरसोबत मिळणार नवे आयुक्त! पती पत्नीच्या नावाची चर्चा आधीच्या मुख्यमंत्र्यांना स्पीड ब्रेकर आणि स्थगितीशिवाय काही माहित नव्हते. फेसबुक लाइव्ह नाही तर फेस टू फेस काम करावे लागते, मी मुख्यमंत्री झाल्यावर सगळ्या स्थगित्या उठवल्या. कोकण ते पश्चिम महाराष्ट्राजवळ आणण्याचे काम सुरु झालंय. Ladki Bahin Yojana : आम्ही उठाव करून साडेतीन वर्ष झाले. विधानसभा निवडणुकीत शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला,” असे सांगत एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केली. दरम्यान, राज्यात जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी असून, या निवडणुकांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली आहे. विविध जिल्ह्यात त्यांच्या प्रचारसभा होणार आहेत. Ladki Bahin Yojana : हेही वाचा: Alankar Agnihotri : UGC नियमांविरुद्ध राजीनामा दिल्याने दंडाधिकारी अलंकार अग्निहोत्री निलंबित ; प्रशासनाकडून ओलीस ठेवल्याचा केला होता आरोप