Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजने (Ladki Bahin Yojana) संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेअंतर्गत दरमहा १,५०० रुपये बँक खात्यात जमा केले जातात. ही योजना (Ladki Bahin Yojana) गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान अनेक अनियमितता समोर आल्या होत्या. पात्र नसलेल्या महिलांनी, आणि काही सरकारी नोकरीत असलेल्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आले. यामुळे सरकारने मागेच अशा महिलांना योजनेच्या यादीतून वगळले होते. Ladki Bahin Yojana केवायसी पडताळणीनंतर मोठी कारवाई लाभार्थ्यांची योग्य पडताळणी व्हावी आणि फक्त पात्र महिलांनाच लाभ मिळावा, यासाठी राज्य सरकारने केवायसी (KYC) प्रक्रिया अनिवार्य केली होती. गेल्या दीड वर्षांपासून ही पडताळणी सुरू होती. ३० एप्रिल रोजी केवायसी पूर्ण करण्यासाठी सरकारने तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली होती, मात्र ती मुदत आता संपली आहे. या प्रक्रियेनंतर सरकारने ५४ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरवले आहे. पात्र आणि अपात्र महिलांची संख्या – पात्र महिलांची संख्या : १ कोटी ८९ लाख – अपात्र ठरलेल्या महिलांची संख्या : ५४ लाख ज्या १ कोटी ८९ लाख महिलांना पात्र ठरवण्यात आले आहे, त्यांच्या बँक खात्यात दरमहा नियमितपणे १,५०० रुपये जमा होत राहतील. अपात्र ठरण्याची कारणे सरकारने सांगितल्याप्रमाणे, काही महिलांनी केवायसीच (Ladki Bahin Yojana) केली नाही, तर काहींनी केवायसी केली असली तरी त्या योजनेच्या अटींमध्ये बसत नव्हत्या. यामध्ये उत्पन्न मर्यादा ओलांडणे, सरकारी नोकरी किंवा इतर अयोग्य निकष पूर्ण करणे यांचा समावेश आहे. अशा सर्व महिलांना योजनेच्या यादीतून वगळण्यात आले आहे.