मुंबई : राज्य सरकारनं अर्थसंकल्पात ‘लाडकी बहीण’ ही महत्त्वकांक्षी योजना जाहीर केली होती. या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका भाऊ योजना सुरु केली आहे. सरकारने यासाठीचा GR देखील काढला आहे.
काय आहे लाडका भाऊ योजना?
या योजनेअंतर्गत 12 वी पास तरुणांना 6 दरमहा 6 हजार, डिप्लोमा झालेल्या तरुणाला 8 हजार तर पदवीधर तरुणाला 10 हजार रुपये महिना मिळतील.या योजनेतील तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप करेल, त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल. या योजनेनुसार राज्यातील तरुण ज्या कारखान्यात काम करतील अप्रेन्टिसशिप करतील तिथे सरकारकडून पैसे भरण्यात येतील. तसेच या तरुणांना स्टायपंडदेखील देण्यात येणार आहे.
‘लाडका भाऊ योजने’साठी पात्रता काय?
– या योजनेसाठी फक्त महाराष्ट्रातील तरुण पात्र आहेत.
– या तरुणांचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे
– शैक्षणिक पात्रतेचे 12 वी पास, डिप्लोमा, पदवीधर असे 3 गट आहेत
– शिक्षण सुरु असणाऱ्या तरुणांना योजनेचा लाभ घेता येणार नाही
– बेरोजगार तरुणांनाच या योजनेचा फायदा मिळेल
– अर्जदारचे बँक खाते आधारकार्डशी संलग्न असावे
– इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी.
लाडका भाऊ योजनेचा फायदा कुणाला?
12 वी उत्तीर्ण – दरमहा 6 हजार रुपये
डिप्लोमा झालेला तरुण – दरमहा 10 हजार रुपये
पदवीधर तरुण – दरमहा 10 हजार रुपये
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचे स्वरूप
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे. या उपक्रमांर्तगत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील. रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमतावाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण (CM Youth Work Training Scheme) योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागाचे संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी करतील.