“लाडाची लेक गं…’ ‘या’ अभिनेत्रीला वडीलच सांगतात गडद रंगाची बिकिनी घे..

मुंबई –  हिंदी आणि तामिळ सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका ‘रकुलप्रीत सिंह’ आपल्या ग्लॅमर आणि बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. ‘यारियां’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आज रकुलप्रीतने आपल्या बोल्ड अँड ग्लॅमर्स लूकने अनेक बड्या अभिनेत्रींना मागे टाकले आहे. 

रकुला आधीपासूनच कालक्षेत्राची आवड होती.  2009 प्रदर्शित झालेल्या “गिल्ली’ या कन्नड चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत आपले पाऊल टाकले. रकुल सोशल मीडियावर जोरदार ऍक्टिव्ह असते. ती नेहमीच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हटके अंदाजात फोटो शेअर करत असते. यामध्ये तिचे बिकिनी फोटशूट सर्वाधिक असतात. या फोटोंमध्ये रकुलचा अतिशय बोल्ड अंदाज दिसून येतो.

दरम्यान, सिनेसृष्टीतील अनेक नवोदित अभिनेत्री बिकिनी फोटोशूट मुळे सोशल मीडियावर ट्रोल होत असतात. रकुला देखील सुरुवातीला ट्रोल करण्यात आले होते. मात्र तिला या गोष्टींचा काहीच फरक पडत नाही. तिच्यासाठी तिच्या परिवाराचा पाठिंबा सर्वात महत्त्वाचा आहे. असे तिने स्वतः हा सांगितले होते.

एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखती दरम्यान रकुलने या गोष्टीचा खुलासा केला. रकुल म्हणाली कि, “याआधी अनेकदा मी बिकनी कशी घालू हा प्रश्न सतावायचा. मात्र मला आईवडिलांनी नेहमीच पुढे जाण्याचा सल्ला दिला. एका स्पर्धेदरम्यान मला बिकिनी घालावी लागेल या गोष्टीची भीती होती. मी ही गोष्ट आईला सांगितली आणि मी यासाठी तयार नाही हे सुद्धा सांगितलं. त्यावेळी आई मला म्हणाली की यात कोणतीही एवढी मोठी गोष्ट नाही. तू स्वतःला या गोष्टीसाठी तयार कर.

 

रकुलने पुढे सांगितलं कि, जेव्हा मी बिकानीच्या शॉपिंग साठी जायची तेव्हा माझे वडील स्वतः सांगायचे की बिकनी गडद रंगाची घे. हलक्या रंगाची घेऊ नको. रकुलने सांगितले की सुरूवातीपासून च तिचे आई वडील ओपन माईंडेड आहेत. आणि हीच गोष्ट आज माझ्यासाठी फायदेशीर आणि चांगली ठरते. 

 

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.