ब्रिस्बेन – कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अनुभवी चेतेश्वर पुजारा यांनी केलेल्या अत्यंत ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा लाभ घेत मार्नस लेबुशेनने दमदार शतक फटकावले. त्याच्यासह अन्य फलंदाजांनी केलेल्या उपयुक्त फलंदाजीच्या जोरावर यजमान ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या निर्णायक चौथ्या कसोटी सामन्यात शुक्रवारी पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा आपल्या पहिल्या डावात 5 बाद 274 धावा केल्या आहेत. खेळ संपला तेव्हा कॅमरॉन ग्रीन 28 तर कर्णधार टीम पेन 38 धावांवर नाबाद होते.
नाणेफेक जिंकून टीम पेनीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात यजमानांची अवस्था 2 बाद 19 अशी बिकट झाली होती. मात्र, त्यानंतर भारताचा कर्णधार रहाणेसह पुजारा व पंतने मार्नस लेबुशेनचे सोडलेले झेल चांगलेच महागडे ठरले. लाबुशेन 37 धावांवर खेळत असतानार अजिंक्य रहाणेने आणि त्यानंतर 48 धावांवर खेळत असताना चेतेश्वर पुजाराकडूनही लाबुशेनचा झेल सोडले. त्यानंतर लाबुशेन यांनं याचा फायदा घेत शतकी खेळी केली.
ऑस्ट्रेलियाची अवस्था 2 बाद 19 अशी झाली होती. यानंतर मार्नल लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. सुंदरने स्टीव्ह स्मिथला 36 धावांवर रोहित शर्माच्या हाती झेलबाद करत ही जोडी फोडली. स्मिथ बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 3 बाद 87 धावा झाल्या होत्या. मात्र यानंतर लाबुशेन आणि मॅथ्यू वेडने चौथ्या विकेटसाठी 113 धावांची निर्णायक भागिदारी करताना संघाला द्विशतकी मजल मारून दिली. नटराजनने वेडला 45 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. वेड बाद झाला तेव्हा यजमानांनी 200 पर्यंत मजल मारली होती.
त्यानंतर मार्नस लाबुशेन शतकी खेळीनंतर बाद झाला. नटराजनने लाबुशेनला 108 धावांवर रिषभ पंतच्या हाती झेलबाद केलं. लाबुशेनने 204 चेंडूत 9 चौकारांसह 108 धावा केल्या. लाबुशेन बाद झाला तेव्हा संघाची धावसंख्या 213 होती. त्यानंतर कर्णधार टीम पेन आणि कॅमेरॉन ग्रीन या जोडीने दिवसाचा खेळ संपेपर्यंत चांगला खेळ केला आणि आणखी पडझड होऊ न देता संघाची धावसंख्या 274 पर्यंत नेली. या दोघांनी दिवसखेर नाबाद 61 धावांची भागीदारी केली आहे.
भारतीय संघाकडून पदार्पण केलेल्या नटराजनने 20 षटकांत 63 धावा 2 बळी घेतली आहेत तर मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 1 फलंदाजाला बाद केलं.
संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 87 षटकांत 4 बाद 274 धावा. (मार्नस लेबुशेन 108, मॅथ्यू वेड 45, स्टिव्ह स्मिथ 36, टीम पेनी खेळत आहे 38, कॅमेरुन ग्रीन खेळत आहे 28, टी. नटराजन 2-63, महंमद सिराज 1-51, वॉशिंग्टन सुंदर 1-63, शार्दुल ठाकूर 1-67).