विरोधकांच्या अनुपस्थितीत कामगार सुधारणा विधेयके मंजूर

नवी दिल्ली – राज्यसभेतील सदस्यांच्या निलंबनाच्या पर्श्‍वभुमीवर कॉंग्रेससह बहुतेक विरोधी पक्षांच्या सदस्यांनी संसदेच्या कामकाजावर बहिष्कार घातलेला असतानाच सरकारने आज कामगार क्षेत्रातील तीन महत्वाची विधेयके मंजूर करून घेतली. 

केंद्र सरकारने कामगार क्षेत्रात सुरू केलेल्या सुधारणेची प्रक्रिया कामगार कल्याणाबाबत मैलाचा दगड ठरेल, असे कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी आज लोकसभेत सांगितले. 

राज्य सरकारे आणि अन्य संबंधितांशी व्यापक चर्चा केल्यानंतरच सरकारने या कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचे ठरवले आहे. विधेयकांची छाननी करताना प्रवर समितीने सुचवलेल्या सुधारणांपैकी तीन चतुर्थांश शिफारसी सरकारने स्वीकारल्या आहेत, असे गंगवार यांनी सांगितले.

व्यवसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या ठिकाणची अरोग्यदायी परिस्थिती, औद्योगिक संबंध आणि सामाजिक सुरक्षेशी संबंधित विधेयक शनिवारी गंगवार यांनी लोकसभेमध्ये मांडले होते.

कामगार क्षेत्राशी संबंधित एकूण 29 कायदे चार कायद्यांमध्ये सामावून घेण्यात अले आहेत. त्यापैकी वेतनाशी संबंधित कायदा यापूर्वीच मंजूर करण्यात आला आहे, असे गंगवार यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.