लांब केसांमधला आमिरचा ‘हा’ हटके लूक पाहिला का?

मुंबई – बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा आगामी चित्रपट ‘लाल सिंह चढ्ढा’ चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटासाठी आमिरचा वेगळाच लूक प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. मागील काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा आमिरचा पगडीमधला लूक समोर आला होता. आता पुन्हा एकदा आमिरचा आणखी एक लूक समोर आला आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे.

या नवीन लूकमधील आमिरचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. या नवीन लूकमध्ये आमिर लांब केसांमध्ये आणि लांबलचक दाढीमध्ये दिसून येत आहे. सोबतच डोक्यावर त्यांनी कॅप घातल्याचे पहायला मिळत आहे, आणि आमिरने वजन चांगलेच वाढवल्याचे दिसून येत आहे. मात्र, या लूकमध्ये आमिरला ओळखण्यात प्रेक्षक अपयशी ठरत आहे.

 

View this post on Instagram

 

Sat Sri Akaal ji, myself Laal…Laal Singh Chaddha.🙏

A post shared by Aamir Khan (@_aamirkhan) on

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)