ला लिगा फुटबॉल स्पर्धा : बार्सिलोना – विलारेल सामना बरोबरीत

बार्सिलोना -बदली खेळाडू म्हणून सामन्यात उतरलेल्या लियोनल मेस्सीने 90 व्या मिनिटाला तर लुईस सुवारेजने 90+3 मिनिटांनी नोंदवलेल्या गोलच्या जोरावर बार्सिलोना संघाने ला लिगा फुटबॉल स्पर्धेत 4-2 अशी पिछाडी भरून काढत व्हिलारेयाल विरुद्धचा सामना 4-4 असा बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले.

या सामन्यात विलारेलने प्रथम आक्रमक सुरुवात केली. परंतु, पहिला गोल बार्सिलोनाच्या फिलिप कुटिन्होने 12 व्या मिनिटाला पहिला गोल नोंदवत बार्सिलोनाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. तर, पुढील चारच मिनिटांत (16) माल्कमने संघासाठी दुसरा गोल करत बार्सिलोनाची आघाडी 2-0ने वाढवली. यानंतर मात्र व्हिलारेयालच्या खेळाडूंनी जोरदार पुनरागमन केले. 23व्या मिनिटाला सॅम्युएल शुकवेझने पहिला, तर 50व्या मिनिटाला टोको एकाम्बीने व्हिलारेयालसाठी दुसरा गोल करत संघाला 2-2 अशी बरोबरी साधून दिली.

मध्यंतरानंतर व्हिलारेयालच्या व्हिन्सेंट एबोरा (62) व कालरेस बाका (80) यांनी आणखी गोल झळकावून व्हिलारेयालची आघाडी 4-2 अशी केली. अखेरच्या 10 मिनिटांत दोन गोल करणे बार्सिलोनाला कठीण जाणार असे वाटत असतानाच बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या मेस्सीने 90व्या मिनिटाला फ्री किकद्वारे संघासाठी तिसरा, तर भरपाई वेळेत (93) सुआरेझने डाव्या कोपऱ्यातून बार्सिलोनासाठी चौथा गोल नोंदवून अखेरच्या क्षणी सामना 4-4 असा बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.