L2 Empuraan OTT Release | दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांची मुख्य भूमिका असलेला ‘एल-२ एम्पुरान’ २७ मार्च २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने जगभरात २६० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. आता हा चित्रपट तुम्हाला घरबसल्या देखील पाहता येणार आहे. या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.
‘एल-२ एम्पुरान’ येत्या २४ एप्रिलपासून जिओ हॉटस्टार या ओटीटी माध्यमावर पाहता येणार आहे. स्वत: मोहनलाल यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे. हा चित्रपट ओटीटीवर धमाल उडवण्यास सज्ज आहे. त्यांच्या या पोस्टमध्ये अभिनेत्याने लिहिले, ‘एल2: एम्पुरान 24 एप्रिलपासून फक्त जियो हॉटस्टारवर स्ट्रीमिंग होईल.’
Empuraan on Hostar | April 24. pic.twitter.com/IExvMoiSqS
— LetsCinema (@letscinema) April 17, 2025
‘एम्पुरान’ हा २०१९ च्या ‘लूसिफर’ या अॅक्शन-थ्रिलर चित्रपटाचा सीक्वेल आहे. त्यामध्ये मोहनलाल राजकीय भूमिकेत आहेत. तर पृथ्वीराज सुकुमारन झायेद मसूदची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात अभिमन्यू सिंह, पृथ्वीराज सुकुमारन, गेम ऑफ थ्रोन्स फेम जेरोम फ्लिन, मंजू वॉरियर, इंद्रजीत सुकुमारन आणि टोविनो थॉमस यांनी मोहनलालच्या ‘एल-२ एम्पुरान’मध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. L2 Empuraan OTT Release |
या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन पृथ्वीराज यांनी केले आहे. हा चित्रपट मल्याळमसह हिंदी, तेलुगू, कन्नड आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता.
हेही वाचा:
“इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध, हा कोणता विचार?”; देवेंद्र फडणवीसांचा सवाल