मोहाली – सलामीवीर फलंदाज फाफ डू प्लेसीच्या धडाकेबाज 96 आणि सुरेश रैनाच्या 53 धावांच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने किंग्ज इलेव्हन पंजाबसमोर विजयासाठी 171 धावांचे आव्हान ठेवले आहे.
तत्तूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाबने नाणेफेक जिकूंन प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत चेन्नई सुपर किंग्जला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकांत 5 बाद 170 धावा केल्या. चेन्नईकडून फाफ डू प्लेसीने 55 चेंडूत 4 चौकार आणि 6 षटकारासह सर्वाधिक 96 धावा केल्या. तर सुरेश रैनाने 38 चेंडूत 53 धावा केल्या. किंग्ज इलेव्हन पंजाबकडून गोलंदाजीत सैम करणने 4 षटकांत 35 धावा देत 3 विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमीने 2 विकेट घेतल्या.
Shami's 2 final over wickets helped restrict @ChennaiIPL to 170/5 after @faf1307 timed a sweet and watchable 96 🙌#KXIPvCSK pic.twitter.com/lFQgVUBvB2
— IndianPremierLeague (@IPL) May 5, 2019