नवी दिल्ली – खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने खादी आणि ग्रामोद्योगातील उत्पादनासाठी नव्हे इ- कॉमर्स पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलवर 50 हजार पेक्षा अधिक उत्पादने उपलब्ध करण्यात आली आहेत.
त्यामुळे खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रातील उत्पादनांना इ-कॉमर्स बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या पोर्टलच्या उद्घाटनावेळी लघुउद्योग सचिव ए के शर्मा यांनी सांगितले की, यामुळे उत्पादने तयार करणाऱ्यांना आणि विकत घेणाऱ्यांना लाभ होणार आहे. गेल्या अनेक महिन्यापासून यासाठी काम चालू होते. करोनासारखा प्रकार अनुभवल्यानंतर रिटेल विक्री कमी होते. त्यामुळे इ- कॉमर्स पोर्टल विकसित करण्यावर भर देण्यात आला.
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार यांनी सांगितले की, असे पोर्टल सुरू करण्यात आल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि आत्मनिर्भर भारत धोरणाला चालना मिळणार आहे. केंद्र सरकारने गेल्या काही वर्षापासून खादी उत्पादनांना चालना दिली आहे. त्यामुळे गेल्या वर्षी खादी उत्पादनाच्या मागणीत 25 टक्के वाढ झाली आहे.
या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. ग्राहकांना इ- कॉमर्स पोर्टलमुळे ग्राहकांना योग्य प्रकारची ओरिजनल खादी उत्पादने उपलब्ध होतील. त्यांची फसवणूक होणार नाही. खादी ग्रामोद्योग आयोगाच्या नावाने खादी उत्पादने विकणाऱ्या कंपन्यावर कारवाई करण्याची मोहीम चालू आहे, असे त्यांनी सांगितले.