टोकियो – वयाची साठी जवळ आलेल्या कुवैतच्या अब्दुल्ला अलरशिदी यांनी यंदाच्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत ब्रॉंझपदक जिंकले व वयापेक्षा खेळण्याची इच्छाशक्ती महत्त्वाची असते हेच सिद्ध केले.
सात वेळा ऑलिम्पियन राहिलेल्या अलरशिदी यांनी पुरुषांच्या स्कीट स्पर्धेत ब्रॉंझपदक जिंकले. मात्र, सुवर्णपदक जिंकता आले नसले तरीही आगामी 2024 साली होत असलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वयाच्या 61व्या वर्षी सुवर्णपदक पटकावणार असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
या स्पर्धेत अमेरिकेच्या व्हिन्सेंट हॅनकॉकने सुवर्णपदक जिंकले आणि तीन सुवर्णपदके जिंकणारा तो पहिला स्कीट नेमबाज ठरला आहे. मात्र, चर्चा झाली ती अलरशिदी यांचीच. अलरशिदी यांनी 1996 सालच्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा भाग घेतला होता.