Kuwait News : कुवेतमध्ये (Kuwait News) एका वीज आणि पाणी शुद्धीकरण प्रकल्पावर इराणने केलेल्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे पश्चिम आशियामध्ये महिनाभरापासून सुरू असलेल्या (Kuwait News) संघर्षामुळे मृत्युमुखी पडलेल्या एकूण भारतीय नागरिकांची संख्या आठवर पोहोचली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणकडून रविवारी एका प्रोजेक्टमधील इमारतीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात इमारतीचे मोठे नुकसान झाले असून एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. कुवेतस्थित भारतीय दूतावासाने या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. Kuwait News भारतीय राजदूत परमिता त्रिपाठी यांनी सोमवारी कुवेतच्या मध्यवर्ती शवगृहाला भेट दिली. पाणी शुद्धीकरण प्रकल्पावरील हल्ल्यात रविवारी ज्या भारतीय नागरिकाचा बळी गेला होता, त्याचे पार्थिव याच शवगृहात आणण्यात आले होते. दूतावास (Kuwait News) मृत भारतीय नागरिकाच्या कुटुंबाच्या संपर्कात असून पार्थिवाच्या त्वरित हस्तांतरणासाठी कुवेतच्या प्रशासनाशी समन्वय साधत आहे, असे दूतावासाने म्हटले आहे. मात्र त्यांनी मृताविषयीचे अधिक तपशील उघड केले नाहीत.