कॉमिक टायमिंगसाठी ओळखला जाणारा बॉलीवूडमधील अभिनेता कुणाल रॉय कपूर आता संजय दत्तची भाची नाजिया हुसैनसोबत झळकणार आहे. “मुश्किल – फीयर बिहाइंड यू’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात कुणाल एका रोमांटिक हिरोची भूमिका साकारणार आहे.
“डेल्ही बेली’यासारख्या विनोदी चित्रपटात काम केलेला कुणाल रॉय कपूर म्हणाला, चित्रपटांमध्ये सुरुवातीच्या काळात रोमांटिक गाणे करताना खूपच अनकम्फर्टेबल वाटत होते. असे गाणे चित्रिकरण करताना मला खूपच अस्वस्थ वाटायचे. पण आता माझा अभिनय चाहत्यांच्या पसंतीला उतरत असून डायरेक्टर राजीव रुइया यांनाही माझ्यावर पूर्ण विश्वास आहे.
याबाबत रुइया म्हणाले, रोमांटिक सॉंगसाठी कुणाल होकार देईल का नकार देईल हे मला निश्चित माहीत नव्हते. पण त्याने खूप शांत डोक्याने हे गाणे शूट केले आहे. कुणाल आणि नाजिया यांचा अभिनय खूपच उत्कृष्ट आहे. या गाण्याचे चित्रिकरण खूपच खास झाले असून त्याचे चित्रिकरण ग्रीसमध्ये करण्यात आले होते.