नवी दिल्ली : कॉमेडियन कुणाल कामरा यांना विमान कंपन्यांनी हवाई प्रवासावर बंदी घेतल्यानंतर कामरा यांनी बंदी घालणाऱ्या कंपनीला नोटीस पाठवली आहे.
कामरा यांनी नोटिसीमध्ये म्हंटले आहे कि, माझ्या हवाई प्रवासावरील प्रतिबंध तात्काळ हटवण्यात यावे. तसेच मानसिक त्रास दिल्याबाबद्दल इंडीगो कंपनीने २५ लाखाची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Comedian Kunal Kamra has sent a legal notice to IndiGo Airlines, against IndiGo suspending him from flying with it for 6 months; Kamra has demanded Rs 25 lakhs as compensation and has asked IndiGo to revoke suspension with immediate effect&tender unconditional apology pic.twitter.com/bctCIT3Ziv
— ANI (@ANI) February 1, 2020
विना अट ‘इंडिगो’ ने माफी मागावी
इंडिगो कंपनीने वर्तमानपत्रात जाहिरात प्रकाशित करून माफी मागावी असेही नोटीसमध्ये म्हंटले आहे.
दरम्यान इंडिगो विमानात पत्रकार अर्णब गोस्वामी यांना त्रास दिल्याबाबदल कुणाल कामरा यांच्यावर विमान कंपन्यांनी बंदी घातली आहे.