कुंभमेळ्यात 109 कोटीचा ‘तंबू’ घोटाळा; बोगस बिले देणाऱ्या ‘या’ कंपनीवर गुन्हा दाखल

प्रयागराज – कुंभ मेळ्यासाठी तंबू पुरवणाऱ्या लल्लूजी अँड सन्स या कंपनीवर 109 कोटीचा घोटाळा केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून खोटी बिले सादर करून 109 कोटी 85 लाख रूपये लाटल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

2019च्या कुंभमेळ्यात माल पुरवल्याबद्दल ही बिले अदा करण्यात आली होती. महा कुंभ, कुंभ आणि माघ मेळ्याला ही कंपनी वर्षानुवर्ष तंबू, फर्निचर आणि ध्वनीवर्धक पुरवण्याचे काम करते. या कंपनीने फेब्रुवारी 2017 ते सहा जुलै 2019 या काळात 196.24 कोटी रुपयांची बिले सादर केली होती. त्यातील केवळ 86 कोटी 38 लाखांचीच बिले खरी असल्याचे पडताळणीत आढळून आले.

अतिरिक्त कुंभ मेळा अधिकारी दयानंद प्रसाद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रयागराज येथील धर्मगंज पोलिस ठाण्यात तंबू पुरवठादारांमध्ये आघाडीचे नाव असणएऱ्या लालुजी अँड सन्स या कंपनीवर गुन्हा नोंदवण्यात आला. कंपनीच्या 11 जणांना अटक करण्यात आली आहे.

आतापर्यंत कंपनीला 171 कोटी रुपये देण्यात आले आहेत. या कंपनीने सरकारच्या अनेक खात्यांना बोगस बिले सादर केली आहेत. त्याबद्दल एकूण ही रक्कम लाटली आहे. पुडील पाच वर्षासाठी या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय प्रयागराज मेळा प्रशासनाने घेतला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.