कुमार विश्वास यांचा पी. चिदंबरम यांना समोर येण्याचा सल्ला

नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया घोटाळ्यात अडकलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना  ”पळू नका समोर या” असा सल्ला कुमार विश्वास यांनी दिला आहे. चिदंबरम यांना न्यायालयाकडून दिलासा नमिळाल्याने ते सध्या बेपत्ता आहेत. त्यामुळे तुम्ही जर निर्दोष असाल तर कायद्यापासून पळून न जाता मैदानात येऊन लढाई लढा असा सल्ला विश्वास यांनी ट्विटर वरून दिला आहे.

आज जे गृहमंत्री, पंतप्रधान आहेत. त्यांच्याविरुद्ध सुद्धा वर्षानुवर्षे तपास चाललेला आहे. त्यामुळे तपस हा एक राजकीय कटाचा भाग असू शकतो त्याचा तुम्ही सामना करायला हवा.
परंतु देशाचे माजी कायदेमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री कायद्याला घाबरून पळ काढताहेत. त्यामुळे तुमचे आणि तुमच्या पक्षाचे दोघांचेही नुकसान होत आहे. तुम्ही जर निर्दोष आहात तर समोर येवून लढले पाहिजे, असे विश्वास यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. कुमार विश्वास यांनी गृहमंत्री आणि पंतप्रधानांचा उल्लेख केला असला तरी त्यांनी थेट अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे नाव घेणे टाळले आहे.

पी. चितांबराम यांना सुप्रीम कोर्टाकडून देखील दिलासा नमिळाल्याने त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात न्या. रमण्णा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यांनी या प्रकरणी कोणतेही आदेश दिले नाहीत. त्यांनी हे प्रकरण सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याकडे पाठवलं होतं. गोगोई यांनी या प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

जाँच राजनीति प्रेरित हो सकती हैं,आज के गृहमंत्री/प्रधानमंत्री के ख़िलाफ़ वर्षों होती रही हैं ! लेकिन राजनिति में होकर,देश के पूर्व क़ानून/गृहमंत्री/वित्तमंत्री जी, क़ानून से भागकर आप अपना और अपने दल का पक्ष कमजोर ही कर रहे हैं ! निर्दोष हैं तो मैदान में लड़िए #ChidambaramMissing

— Dr Kumar Vishvas (@DrKumarVishwas) August 21, 2019

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×