नव्वदीच्या दशकातील तमाम सिनेरसिकांवर आणि दर्दी प्रेमीयुगुलांवर आपल्या मनमोहक आवाजाने मोहिनी घालणाऱ्या कुमार सानू यांची कन्या शेनन हीदेखील एक गायिका आहे. शेनने आतापर्यंत अनेक गायकांसोबत गाणी म्हटली आहेत. साहजिकच, तिच्या आणि कुमार सानूंच्या चाहत्यांची अशी इच्छा होती की या दोघांनी एकत्र एखादे गाणे गावे…!
पण कुमार सानूंनी यास नकार दिला आहे. त्यांना मुलीबरोबर गाणे गायचे नाहीये. याबाबत बोलताना ते म्हणतात की, “इटस् मॅजिकल’ हे गाणे आम्ही एकत्र गायले आहे. मी हिंदीमध्ये गायले आहे, तर शेनने इंग्रजीमध्ये गायले आहे. पण तिच्यासोबत मी रोमॅंटिक गाणे म्हणू शकत नाही.
कारण आमचे नाते बाप-लेकीचे आहे. त्यामुळे याबाबतची विनंती न केल्यास बरे राहील! शेनन एकता कपूरच्या आगामी एका चित्रपटात हिमेश रेशमियांसोबत पार्श्वगायन करत आहे. ती कुमार सानूंची दत्तककन्या आहे.