कुमार लिटील टेनिस : आर्यन, रोहन, माहिका यांचे विजय

पुणे – पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने 12 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पाचव्या पीएमडीटीए-केपीआयटी कुमार लिटल चॅम्पियनशिप सिरिज टेनिस स्पर्धेत आर्यन कीर्तने, रोहन बजाज, माहिका रेगे या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत आगेकूच केली.

स्वराज्यरक्षक संभाजी महाराज क्रीडा संकुल, कर्वेनगर येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात उप-उपांत्यपूर्व फेरीत बिगरमानांकीत आर्यन कीर्तने याने सातव्या मानांकित सनत कडलेचा टायब्रेकमध्ये 6-5 (3) असा पराभव करून अनेपक्षित निकालाची नोंद केली. रोहन बजाजने सहाव्या मानांकित स्वर्णीम येवलेकरचा 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव केला. पाचव्या मानांकित वैष्णव रानवडे याने सर्वज्ञ सरोदेचा टायब्रेकमध्ये 6-5 (3) असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.

मुलींच्या गटात उप-उपांत्यपूर्व फेरीत माहिका रेगे हिने पाचव्या मानांकित अवंतिका सैनीचा 6-2 असा सहज पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. तिसऱ्या मानांकित स्वरा जावळे व श्रेया होनकन यांनी अनुक्रमे वैष्णवी नागोजी व सान्वी थंपी यांचा 6-1 असा एकतर्फी पराभव करून आपले आव्हान कायम राखले.

संक्षिप्त निकाल

उप-उपांत्यपूर्व फेरी – मुले – समिहन देशमुख (1) वि. वि. रोहन बोर्डे 6-2. आरव पटेल वि. वि. नीरज जोर्वेकर 6-3. नमिश हूड (4) वि. वि. शौर्य बोऱ्हाडे 6-1. आर्यन किर्तने वि. वि. सनत कडले (7) 6-5 (3). वैष्णव रानवडे (5) वि. वि. सर्वज्ञ सरोदे 6-5 (3). प्रज्ञेश शेळके वि. वि. वीरेन चौधरी 6-2. रोहन बजाज वि. वि. स्वर्णीम येवलेकर (6) 6-4. वेद मोघे वि. वि. क्रिशय तावडे 6-2. मुली – काव्या देशमुख (1) वि. वि. काव्या पांडे 6-2. रित्सा कोंडकर (7) वि. वि. सारा फेंगसे 6-0.

काव्या तुपे (4) वि. वि. ओजसी देगमवार 6-2. माहिका रेगे वि. वि. अवंतिका सैनी (5) 6-2. करीश कक्कत वि. वि. मृदुला साळूंके 6-1. स्वरा जावळे (3) वि. वि. वैष्णवी नागोजी 6-1.
श्रेया होनकन वि. वि. सान्वी थंपी 6-1. ध्रुवा माने (2) वि. वि. अनुष्का जोगळेकर 6-3.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.