कुलदीप यादव भारतासाठी उपयुक्त ठरेल – झहीर खान 

नवी दिल्ली: कसोटी सामन्यांच्या मालिकेत युवा फिरकीपटू कुलदीप यादव याच्याकडून खूप आशा ठेवणे अयोग्य नाही, असे मत भारताचा माजी गोलंदाज झहीर खान याने व्यक्त करताना इंग्लंडमधील सध्याची परिस्थिती पाहता भारतासाठी दोन विशेषज्ञ फिरकीपटूंना खेळवणे चांगले राहील, असा मोलाचा सल्ला इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापुर्वी त्याने भारतीय संघाला दिला आहे.

काही दिवसांपूर्वीच भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने भारताचा स्पिनर कुलदीप यादवचे कौतुक केले. त्याच्यासारख्या तरुण स्पिनरकडून जास्त अपेक्षा ठेवण्यात काहीच गैर नसल्याचे झहीरला वाटते. येत्या 1 ऑगस्टपासून भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला सुरुवात होते आहे. विशेष म्हणजे सध्या सुरू असलेल्या इसेक्‍सविरुद्धच्या सराव सामन्यात कुलदीपने पहिल्या डावात चार षटके मारा केला अन्‌ यात त्याला एकही विकेट मिळाली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी बोलताना झहीरने सांगीतले की, सध्या इंग्लंडमध्ये नेहमीपेक्षा जास्त उकाडा आहे. हवामान उष्ण आहे. असे वातावरण भारतात असते. तेव्हा आपल्याकडील वातावरणाशी मिळत्याजुळत्या वातावरणात खेळताना भारतीय संघाकडून तसेच स्पिनर्सकडून उजवी कामगिरी होईल. हवामान उष्ण असेल, तर वेगवान गोलंदाजांचे काम वाढेल. मात्र तशा स्थितीत तुमच्याकडे स्पिनरना खेळवण्याचा पर्याय असतो.

अश्‍या वातावरणात भारतालाही दोन तज्ञ स्पिनर खेळवण्याचा मोह होईल असे झहीर नमूद करतो. तरुण स्पिनर कुलदीप यादव सध्या चर्चेत आहे तो त्याच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील चमकदार कामगिरीमुळे. यामुळेही झाले आहे की, कुलदीपकडून अपेक्षा वाढल्या आहेत. यामुळे कुलदीपवरील दडपण वाढेल का? असा प्रश्‍न विचारला असता झहीर खान म्हणाला की, कुलदीपची कामगीरी सध्या चांगली होत आहे त्यातच त्याला भारतीय संघात आपले स्थान पक्‍के करायचे आहे त्यामुळे तो त्या विचाराने या सामन्यात खेळेल आणि सध्या त्याच्या पाठीशी एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांमधिल अनुभव आहे. त्यामुळे तो दडपणा विरहीत खेळताना दिसून येइल असेही त्याने यावेळी सांगीतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)