कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा पाकिस्तानला दणका! 

खटला स्थगित करण्याची मागणी लावली फेटाळून 

नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभुषण जाधव प्रकरणाचा खटला स्थगित करण्याची पाकिस्तानने केलेली मागणी फेटाळली आहे. त्यामुळे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय न्यायालयात मोठा दणका बसला आहे. जाधव प्रकरणांच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाल्यानंतर पाकिस्तानने ही मागणी केली होती. मात्र जोपर्यंत दोन्ही पक्ष आपली बाजू मांडत नाहीत, तोपर्यंत न्यायालयाने ती फेटाळून लावत खटला सुरूच राहणार असे स्पष्ट केले आहे.

पाकिस्तानच्या अटकेत असलेले कुलभूषण जाधव प्रकरणाची सुनावणी 18 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुरु आहे. यात सोमवारी भारताने आपली बाजू मांडली तर आज पाकिस्तानने आपली बाजू मांडली.
कुलभूषण जाधव खटला स्थगित करण्याची पाकिस्तानची मागणी आंतरराष्ट्रीय कोर्टाने मंगळवारी फेटाळली. पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला सुरू आहे. आज कोर्टात पाकिस्तानने आपली बाजू मांडली. सोमवारी भारताने युक्तिवाद करताना म्हटले होते की एका निर्दोष भारतीयाला आपल्या आयुष्यातली महत्त्वाची वर्षे पाकिस्तानच्या तुरुंगात काढावी लागत आहेत. पाकिस्तानच्या वकिलांनी मंगळवारी भारताच्या आरोपांना उत्तर देताना आपली बाजू मांडली.

पाकिस्तानच्या ऍटर्नी जनरलने आपल्या युक्तीवादाची सुरुवातच खोट्या विधानांनी केली. जाधवच नव्हे तर भारतावरही पकिस्तानने दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप केला. जाधव अनेक स्थानिक लोकांच्या संपर्कात होता आणि त्याने पाकिस्तानात दहशत पसरवण्यासाठी अनेक पाकविरोधी शक्तींना सुसाइड बॉम्बर बनवण्यासाठी तयार केले होते. पाकिस्तानच्या विकासातला महत्त्वाचा भाग असणाऱ्या चीन-पाकिस्तान कॉरिडोरच्या मार्गात अडथळे आणण्याचे प्रयत्न झाले. हे कुणा एका व्यक्तीचं काम नाही, पूर्ण देश याला खतपाणी घालत आहे,’ असा युक्तिवाद पाकिस्तानने केला आहे.

आम्ही मानवतेच्या दृष्टिकोनातून जाधवला त्याच्या कुटुंबीयांशी भेटण्याची परवानगी दिली. भारताने अशी कोणती दया भारतीय तुरुंगात खितपत पडलेल्या पाकिस्तानींसाठी दाखवली?, असा सवालही पाकिस्तानने केला. जाधवने शत्रू राष्ट्रांचा बदला घेण्यासाठी अनेक तरुणांना तयार केले होते. या तरुणांच्या माध्यमातून त्याला पाकिस्तानमध्ये दहशत पसरवायची होती. तसेच चीन-पाकिस्तान कॉरिडोरही त्याच्या निशाण्यावर होता. हा एका व्यक्तीचा डाव नसून याला भारताचीही साथ आहे, असा आरोपही मन्सूर खान यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.