कुलभूषण जाधव प्रकरण : आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर पाकिस्तान झुकले, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तान संसदेने माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानद्वारे दिल्या गेलेल्या शिक्षेविरोधात वरिष्ठ कोर्टात अपील करण्याची मंजुरी देणाऱ्या विधेयकाला मंजुरी दिली आहे.

पाकिस्तान संसदेत आज आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय बहुमताने मान्य करण्यात आला आहे. लष्करी कोर्टाने कुलभूषण जाधव यांना एका बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरवून मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती.

पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने एप्रिल २०१७ मध्ये हेरगिरी आणि दहशतवादाची कलमे लावून कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली. पाकमधील लष्करी न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर भारताने या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला फटकारले होते.

भारतीय नौदलातून निवृत्त झालेले कुलभूषण जाधव इराणमध्ये व्यवसायाच्या निमित्ताने गेले होते. त्यांना पाकिस्तानने हेरगिरीसाठी देशात प्रवेश केल्याप्रकरणी अटक केली होती. मात्र, कुलभूषण यांनी पाकिस्तानच्या लष्करी कोर्टात असे सांगितले, की त्यांना इराणमधून अपहरण करुन पाकिस्तानमध्ये आणले आणि खोट्या आरोपांत अटक केली. पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने कुलभूषण जाधव यांचा आरोप फेटाळला आणि त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली होती.

दरम्यान, कुलभूषण जाधव यांना या शिक्षेविरोधात अपील करण्याचाही अधिकार नव्हता. या मुद्यावर आंतरराष्ट्रीय कोर्टाने पाकिस्तानला फटकारले होते. त्यांनंतर आता वरिष्ठ कोर्टात अपील करण्याची मंजुरी देणाऱ्या विधेयकाला पाक संसदेत मंजुरी देेण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.