मुंबई –क्रिकेटपटू कृणाल पंड्या याला गुरुवारी काही काळासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोखण्यात आले. जवळ बाळगलेल्या सोन्याची आणि इतर किमती सामग्रीची माहिती न दिल्याविषयी महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाकडून त्याच्याकडे विचारणा करण्यात आली.
नियमांची माहिती नसल्याने चूक घडल्याचे कृणालने मान्य केले. चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करत त्याने दंड भरला. त्यानंतर त्याला जाण्याची परवानगी देण्यात आली.
आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्स संघाचा कृणाल खेळाडू आहे. त्या स्पर्धेसाठी तो संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) गेला होता. स्पर्धा समाप्त झाल्याने तो भारतात परतला. कृणाल हा भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू हार्दिक पंड्या याचा मोठा भाऊ आहे. हार्दिक भारतीय संघासमवेत ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला.